ऐश्वर्या रायने आराध्याच्या जन्मानंतर केलाय संकटांचा सामना, तिच्यासाठी घेतलेला रवीनाने पुढाकार

ऐश्वर्या रायने आराध्याच्या जन्मानंतर केलाय संकटांचा सामना, तिच्यासाठी घेतलेला रवीनाने पुढाकार

बॉलिवूडची ‘मस्त गर्ल’ अभिनेत्री रवीना टंडन हिने 90 च्या दशकात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज रवीना बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे रवीना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. रवीना यशाच्या शिखरावर तर पोहोचली, पण अभिनेत्रीला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.

एक काळ असा आला होता जेव्हा बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. तेव्हा अभिनेत्रीने काहीही न बोलता मौन बाळगणं योग्य समजलं. त्यानंतर रवीनाने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. एवढंच नाही तर, रवीना हिने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासाठी देखील पुढाकार घेतला होता. सध्या सर्वत्र रवीना – ऐश्वर्या यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

एका मुलाखतीत अभिनेत्रीला कॅमेऱ्यापासून दूर राहण्याच्या अनुभवाबद्दल विचारलं. यावर रवीना म्हणाली, ‘मला तेव्हा माझ्यवर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता. तेव्हा अशी वेळ होती जेव्हा माझ्या शरीरामुळे मझ्यावर निशाणा साधण्यात आला. बॉडी शेमिंगला मी बळी पडली होती. त्यामुळे मी स्वतःच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवणं योग्य समजलं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

रवीना हिने फक्त स्वतःबद्दल नाही, ऐश्वर्या हिच्यासाठी देखील पुढाकार घेतला होता. ‘आई झाल्यानंतर ऐश्वर्या हिला देखील बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. ऐश्वर्या प्रचंड सुंदर आहे, पण जेव्हा आराध्याचा जन्म झाला तेव्हा ऐश्वर्या देखील लाईमलाईटपासून दूर होती. आराध्या हिच्या जन्मानंतर ऐश्वर्याला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं.’

पुढे रवीना म्हणाली, ‘ऐश्वर्याने स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता कुटुंबाला पूर्ण वेळ दिला. तेव्हा मी माध्यमांना पत्र लिहिलं होतं आणि ऐश्वर्या हिच्यासाठी पुढाकार घेतला होता.’ असं देखील रवीना एका मुलाखतीत म्हणाली होती. आज ऐश्वर्या कायम तिच्या मुलीमुळे चर्चेत असते.

रिपोर्टनुसार, आता ऐश्वर्या राय लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत परदेशात जाणार आहे. आराध्या बच्चन पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. पुढच्या शिक्षणासाठी आराध्या लंडन किंवा न्यूयॉर्क याठिकाणी जाऊ शकते. असं सांगण्यात येत आहे. सध्या आराध्या धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे. 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात जाईल.. असं सांगण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;