Lok Sabha Election 2024: साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार

Lok Sabha Election 2024:  साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तब्येतीच्याकारणास्तव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.

श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. मात्र पक्षासाठी सर्व काम करेन असे त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले. सातारा जिल्ह्यातून उमेदवारी द्यायला विशेष काळजी घ्यावी लागते, असे म्हणत शरद पवारांनी सस्पेन्स वाढवला.

श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पुढील दोन-तीन दिवसांत उमेदवार जाहीर केला जाईल, असे शरद पवार म्हणाले.

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद

साताऱ्यातील जागेसाठी दोन-तीन नावे चर्चेत आहेत. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने यांच्यासह सत्यजित पाटील ही नावे चर्चेत असून यावर आम्ही चर्चा करून उमेदवाराची घोषणा करू, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच साताऱ्यातून निवडणूक लढववण्यासाठी मलाही आग्रह होत असल्याचे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चित्रपट मिळत नसताना ही कसा चालतो गोविंदाचा घर खर्च, पाहा कुठून करतो करोडोंची कमाई चित्रपट मिळत नसताना ही कसा चालतो गोविंदाचा घर खर्च, पाहा कुठून करतो करोडोंची कमाई
Actor Govinda Income : गोविंदा हा बॉलीवूडचा मोठा अभिनेता आहे. ज्याने 90 च्या दशकात चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्या काळात गोविंदाचे...
दहापेक्षा अधिक अकाउंट, धर्माकडे झुकाव, ‘तारक मेहताच्या सोढी’चे बेपत्ता होण्याचे रहस्य अखेर..
पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने, डॉ. मुणगेकरांनी केली टीका
तीन टप्प्यांचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणारं; शरद पवार यांचं मोठं भाकित
संदेशखळीतील एका महिलेकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्यांनी खोटी तक्रार केल्याचा आरोप
दोघांच्या वयात 26 वर्षाचे अंतर, तरीही ‘ही’ एक गोष्ट आहे एकसारखी, मिलिंद सोमन आणि अंकिता..
इतका द्वेष केल्याबद्दल धन्यवाद म्हणत ‘अनुपमा’मधील अभिनेत्याने सोडली मालिका