तुझा बॉयफ्रेंड 4 वर्षांनी मोठा..; ‘एक था टायगर’च्या दिग्दर्शकाने सांगितला कतरिना-सलमानचा किस्सा

तुझा बॉयफ्रेंड 4 वर्षांनी मोठा..; ‘एक था टायगर’च्या दिग्दर्शकाने सांगितला कतरिना-सलमानचा किस्सा

दिग्दर्शक कबीर खान हा अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा जवळचा मित्रसुद्धा आहे. ज्यावेळी सलमान आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते, तेव्हापासून कबीर या दोघांना ओळखतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीरने कतरिनाविषयीची एक किस्सा सांगितला. सलमानमुळे कतरिना कबीरच्या ‘न्यूयॉर्क’ चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी तयार झाली होती. जेव्हा तिने या चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हा तिला ती फारशी आवडली नव्हती. यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत हा तिचा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे तिला लव्ह स्टोरी, गाणी, डान्स अशा प्रकारच्या स्क्रिप्टची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तिचा भ्रमनिरास झाला होता.

सलमानमुळे कतरिनाने साइन केला चित्रपट

याविषयी कबीरने सांगितलं, “त्यावेळी ती सलमान खानला डेट करत होती. मला भेटल्यानंतर सलमानने तिला विचारलं की मिटींग कशी झाली? ती त्याला म्हणाली, एक नवीन दिग्दर्शक आहे, ज्याने याआधी एक चित्रपट बनवला होता आणि त्याने मला एक ऑफर दिली आहे. पण त्यात काम करायचं की नाही याबद्दल मी संभ्रमात आहे. हे ऐकून सलमानने तिला दिग्दर्शकाचं नाव विचारलं. तेव्हा तिने सांगितलं, की कबीर खान असं त्याचं नाव आहे. तेव्हा सलमान तिला म्हणाला की डोळे बंद करून तू हा चित्रपट साइन कर. मी त्याला भेटलोय. कतरिनाने मला हा किस्सा बऱ्याच वर्षांनंतर सांगितला. माझी आणि सलमानची पहिली भेट ‘काबुल एक्स्प्रेस’च्या शूटिंगदरम्यान झाली होती. पण ती छोटी भेटसुद्धा सलमानने लक्षात ठेवली होती.”

कतरिना-सलमानचा किस्सा

कबीर खान दिग्दर्शित ‘न्यूयॉर्क’ या चित्रपटात नील नितीन मुकेश आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका होत्या. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये 100 दिवसांत शूटिंग पूर्ण केलं होतं. कतरिनासाठी हा संपूर्ण नवीन अनुभव होता. “ती जेव्हा सेटवर यायची, तेव्हा मला सर म्हणून हाक मारायची. अखेर मला तिला बोलावं लागलं की, यार तुझा बॉयफ्रेंड माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे. कृपया तू मला सर बोलू नकोस.”

शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सासुद्धा कबीर खानने यावेळी सांगितला. “शूटिंगचे पहिले 20 दिवस मी कतरिनाला चुकून करीना म्हणूनच हाक मारत होतो. जेव्हा माझी तिच्याशी चांगली मैत्री झाली, तेव्हा मी तिला बरोबर कतरिना या नावाने हाक मारू लागलो. नंतर बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी करीनाला चुकून कतरिना म्हणून हाक मारू लागलो होतो”, असं तो हसत सांगतो. कबीर खान आणि कतरिना यांच्यात अजूनही चांगली मैत्री आहे. विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाला कबीर त्याच्या पत्नीसोबत आवर्जून उपस्थित होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;