काँग्रेसला 1700 कोटी रुपयांची कर नोटीस

काँग्रेसला 1700 कोटी रुपयांची कर नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने कर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेविरुद्ध पक्षाची याचिका फेटाळल्यानंतर काही तासांतच आयकर विभागाने काँग्रेसला 1,700 कोटी रुपयांची नोटीस बजावली होती. काँग्रेस नेते विवेक तनखा यांनी या घटनेला दुजोरा दिला.

काँग्रेस पक्षाला 2017-18 आणि 2020-21 या मूल्यांकन वर्षांसाठी नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यात दंड आणि व्याजाचा देखील समावेश होता.

आयकर अधिकाऱ्यांनी चार वर्षांच्या कालावधीसाठी कर पुनर्मूल्यांकनाची कार्यवाही सुरू केली होती त्यासंदर्भातील काँग्रेसची याचिका गुरुवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि पुरूषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठानं सांगितलं की, या याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या याआधीच्या निर्णयाच्या संदर्भ घेण्यात आला आहे. ज्यामध्ये आणखी एका वर्षासाठीच्या पूनर्मुल्यांकन करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचं फेटाळून लावण्यात आलं होतं.

सध्याची बाब 2017 ते 2021 या मूल्यांकन वर्षांशी संबंधित आहे.

मागील आठवड्यात फेटाळण्यात आलेल्या याआधीच्या याचिकेत, काँग्रेस पक्षानं 2014-15 ते 2016-17 या मूल्यांकन वर्षांशी संबंधित पुनर्मूल्यांकन कार्यवाही सुरू करण्याला आव्हान दिलं होतं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार ‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील...
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी सांभाळणार ‘मिशन महाराष्ट्र’ची कमान, मुंबईत होणार भव्य रोड शो; कसा असेल कार्यक्रम ?
अवघ्या 17 वर्षांच्या मुलीने मोठमोठ्या अभिनेत्रींना दिली टक्कर; पटकावलं पहिलं स्थान
गरोदरपणातील पाचवा महिना तरीही पोट दिसेना; दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीबाबत चाहत्यांमध्ये प्रश्न
तुझी फक्त 30% वाचण्याची शक्यता; डॉक्टरांचे शब्द ऐकून सोनाली बेंद्रेच्या पायाखालची जमिनच सरकली!
Lok Sabha Elections 2024 : आमदार दीर अन् खासदार भावजय यांच्यातील वैर संपुष्टात ?, लोकसभा निवडणुकीत होणार फायदा
‘त्या’ विधानानंतर चंद्रकांतदादांना बारामतीला यायला मज्जाव?,अजितदादांनी सांगितलं आतलं राजकारण