देश जळतोय आणि तू झोपतोय? परमात्म्याच्या आदेशामुळेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला; हल्लेखोराचा दावा
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे त्या वकिलाचे नाव असून त्यांनी आपण हे सर्व परमात्म्याच्या सांगण्यावरून केल्याचा अजब दावा केला आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत या वकिलाने त्यांनी जे केले त्याचा पश्चाताप नसून आपण कुणाचीही माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.
”मी जे काही केलं त्याचा मला जराही प्रायश्चित नाही. मी कुणाचीही माफी मागणार नाही. तुम्ही मला प्रश्न करताय. पण मी काहीही केले नाही ही परमात्माची इच्छा आहे. मी जेलमध्ये जावे, मला फाशी व्हावी ही परमात्याची इच्छा असेल म्हणून मी हे केले. मी आधीच ठरवून कोर्टात गेलो होतो कारण 16 सप्टेंबर नंतर मला झोप येत नव्हती. परमात्मा मला झोपेतून उठवून सांगत होता की देश जळतोय आणि तु झोपतोय? त्यामुळे मी हे केले. मी माझ्या सोबत दोन दिवसांची औषधं घेऊन गेलो होतो. मला वाटलेलं दोन दिवस मला तुरुंगात राहावं लागेल. पण सरन्यायधीशांनी माझ्यावर कारवाई केली नाही. याला मी त्यांचे उपकार मानू की काय मानू ते समजत नाहीए. पोलिसांनी माझी चौकशी झाली. त्यांनी मला जेवण दिलं चहा बिस्किट दिला. त्यासाठी मी त्यांचे उपकार मानतो”, असे राकेश किशोर म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List