सलमान खानसाठी आयुष्यातील ‘या’ खास व्यक्तीला विसरणं अशक्य, म्हणाला, ‘खूप क्लोज होतो…’

सलमान खानसाठी आयुष्यातील ‘या’ खास व्यक्तीला विसरणं अशक्य, म्हणाला, ‘खूप क्लोज होतो…’

गुरुवारी अभिनेत्री रवीना टंडन हिच्या ‘पटना शुक्ला’ सिनेमाच्या स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता सलमान खान देखील भाऊ अरबाज खान याच्यासोबत उपस्थित होता. तेव्हा एका खास व्यक्तीच्या आठवणीत सलमान खान भावूक झाला. शिवाय सर्वांसमोर भाईजानने त्याच्या मनातील भावना देखील व्यक्त केल्या. ज्या खास व्यक्तीच्या आठवणीत सलमान खान भावूक झाला ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेते सतीश कौशिक होते. गेल्या वर्षी सतीश कौशिक यांचं निधन झालं. पण आद्याप सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या मनात असलेलं प्रेम कमी झालं नाही.

जेव्हा सलमान खान स्क्रिनिंगसाठी पोहोतला तेव्हा पापाराझींनी अभिनेत्याला सतिश कौशिक यांच्याबद्दल विचारलं. यावर भाईजान म्हणाला, ‘सतीश कौशिक माझ्या प्रचंड क्लोज होते. त्यांच्याबद्दल सर्वांत मोठी गोष्ट सांगायची झाली तर, त्यांनी निधनापूर्वी सर्व सिनेमांची शुटिंग पूर्ण केली. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात देखील सतीश होते…’ असं म्हणत सलमान खान भावूक झाला. सलमान खान याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

सलमान खान आणि सतीश कौशिक यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाशिवाय दोघांनी ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ ‘भारत’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सतिश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. त्यांचं निधन झालंय की हत्या अशा चर्चा देखील रंगल्या होत्या.

‘पटना शुक्ला’ सिनेमात सतीश कौशिक यांची भूमिका

‘पटना शुक्ला’ OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 29 मार्चपासून प्रदर्शित होत आहे. अरबाज खान निर्मित सिनेमात सतीश कौशिक न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे. त्यांना पुन्हा पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. सध्या सर्वत्र फक्त आण फक्त ‘पटना शुक्ला’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

सतीश कौशिक यांचं निधन

सतीश कौशिक यांनी गेल्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. 9 मार्च 2023 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालं. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सतीश कौशिक यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं… असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;