नाशिकमधील नवीन रिंग रोडच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दर्जेदार काम करा – फडणवीस

नाशिकमधील नवीन रिंग रोडच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दर्जेदार काम करा – फडणवीस

कुंभमेळा श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळय़ासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम पूर्ण करण्याबरोबरच साधू ग्राम टेंटसिटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत. या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, संपूर्ण कुंभमेळा कालावधीत रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील हे कटाक्षाने पहावे. मलनिस्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात यावीत. विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत.

कुंभमेळा कालावधीत तसेच नेहमीसाठीही नदीपात्रातील पाणी शुद्ध राहील यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. याशिवाय नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेशकुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

निधी त्वरित मंजूर करून घ्या

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घेण्यात यावी. कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांची गैरसोय होता कामा नये याकडे लक्ष द्यावे. विविध आखाडय़ांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ‘एआय’च्या विविध पर्यायांचा वापर करण्यात यावा. ‘मार्व्हल’चाही उपयोग करून घेण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. द्वारका सर्कल येथील कामे त्वरित पूर्ण करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे. वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा-लंगरची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;