चारधाम यात्रेची कपाटं बंद करण्याची तारीख ठरली, केदारनाथ 23 ऑक्टोबरला तर, बद्रीनाथ धाम 25 नोव्हेंबरला बंद होणार

चारधाम यात्रेची कपाटं बंद करण्याची तारीख ठरली, केदारनाथ 23 ऑक्टोबरला तर, बद्रीनाथ धाम 25 नोव्हेंबरला बंद होणार

उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री हे चारधाम यात्रांचे कपाट बंद करण्याची तारीख अखेर ठरवण्यात आली आहे. विजयादशमी रोजी पंचांग गणना केल्यानंतर या धामांचे कपाट बंद करण्याचा शुभ मुहूर्त काढण्यात आला असून 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व कपाट बंद केले जाणार आहेत. त्याआधी रितीरिवाजाप्रमाणे सर्व पूजा-अर्चा केली जाणार आहे. चार धाम यात्रा करण्यासाठी आता भाविकांना केवळ दीड महिना उरला आहे.

गंगोत्री धामचे कपाट 22 ऑक्टोबरला अन्नकुट पर्वाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 11.36 वाजता बंद केले जातील. यमुनोत्री धामचे कपाट 23 ऑक्टोबरला दुपारी साडे बारा वाजता भाविकांसाठी बंद केले जातील. कपाट बंद करण्यात आल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी यमुनेचे दर्शन खरसाली गावात होईल. कपाट बंद होण्याआधी सकाळी मां यमुनेचे बंधू शनिदेव महाराजाची पालखी आपल्या बहिणीला आणण्यासाठी यमुनोत्री धामसाठी रवाना होईल. केदारनाथ धाम 23 ऑक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता बंद केले जातील. तर बद्रीनाथ धामचे कपाट 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजून 56 मिनिटांनी बंद केले जातील. कपाट बंद होण्याऐवजी पंच पूजा 21 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

कोणते धाम कधी बंद होणार?

  • गंगोत्री धाम ः 22 ऑक्टोबर
  • यमुनोत्री धाम ः 23 ऑक्टोबर
  • केदारनाथ धाम ः 23 ऑक्टोबर
  • बद्रीनाथ धाम ः 25 नोव्हेंबर
  • बद्रीनाथ धाममध्ये 14,20,357 भाविकांनी दर्शन केले. केदारनाथ धाममध्ये 16,02,420 भाविकांनी दर्शन घेतले. या दोन्ही धामांचे एकूण 30 लाखांहून अधिक भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;