करारप्राप्त खेळाडूंतून वॉर्नर, स्टोइनिस, अॅगरला वगळले
वृत्तसंस्था /मेलबर्न
अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, जो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून हल्लीच निवृत्त झाला आहे तसेच अष्टपैलू अॅश्टन अॅगर आणि मार्कस स्टॉइनिस यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या 2024-25 मोसमासाठी केंद्रीय करारप्राप्त झालेल्या खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय, व्हिक्टोरियाचा सलामीवीर मार्कस हॅरिस आणि वेगवान गोलंदाज मायकेल नेसर यांनाही करार मिळालेला नाही. 23 खेळाडूंना हा करार मिळालेला आहे, असे ‘क्रिकेट डॉट कॉम ऑस्ट्रेलिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा आगामी हंगाम व्यस्त राहणार आहे, ज्यात ते जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतील आणि वर्षाच्या अखेरीस भारताविऊद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत उतरतील. करारातून वॉर्नरला वगळणे अपेक्षित होते. कारण तो टी-20 विश्वचषकानंतर खेळातून निवृत्त होण्याचा विचार करत आहे. तो सध्या भारतात असून दिल्ली कॅपिटल्सकडून ‘आयपीएल’ खेळत आहे. स्टॉइनिसला वगळणे ही सर्वात लक्षणीय बाब आहे. हा 34 वर्षीय खेळाडू सध्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सतर्फे खेळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List