गोरेगावात एक कोटीचा एमडी ड्रग्ज जप्त; दोघा तस्करांना अटक

गोरेगावात एक कोटीचा एमडी ड्रग्ज जप्त; दोघा तस्करांना अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने गोरेगाव येथे ड्रग्ज विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा ड्रग्ज तस्करांना उचलले. त्या दोघांकडे एक कोटी रुपये किमतीचा 427 ग्रॅम एमडी साठा मिळून आला. गोरेगाव परिसरात दोन ड्रग्ज तस्कर एमडीचा साठा घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटला मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्या दोघा ड्रग्ज तस्करांना पकडले. दोघांच्या अंगझडतीत 427 ग्रॅम वजनाचा एमडी साठा मिळाला. जवळपास एक कोटी सहा लाख रुपये किमतीचा हा एमडी असल्याने ड्रग्ज तस्करांना चांगलाच दणका बसला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;