ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अर्थव्यवस्था अडचणीत; अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद

ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अर्थव्यवस्था अडचणीत; अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफचा कोणताही परिणाम हा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर होणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना स्पष्ट दिसत आहे. तसेच याबाबतच्या अहवालातूनही माहिती मिळत आहे. अमेरिकेने हिंदुस्थानवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफचा परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. हिंदुस्थानातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली आहे.

हिंदुस्थानसाठी अनेक वर्षांपासून अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ राहिली आहे. भारत-अमेरिकेचा व्यापार कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र, आता अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिके वस्तू पाठवणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची निर्यात थांबव्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे.

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा अत्यंत मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आता येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशाची आर्थिक वाढ मंदावेल अशी भीती व्यक्त होत आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) म्हटले आहे की, 2026 च्या पहिल्या तिमाहीत 7.9 टक्के मजबूत वाढ झाली असली तरी, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 6.5 टक्के दराने वाढेल. अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर दुसऱ्या तिमाहीत तेजीत असलेली अर्थव्यवस्था मंदावू शकते. एडीबीने 2025 (आर्थिक वर्ष 2026) यासोबतच 2026 (आर्थिक वर्ष 2027) साठी भारताचा विकास दर 6.5 टक्के राहिल असा अंदाज आहे. त्यामुळे आता टॅरिफचे परिणाम दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;