Hair Care – रात्री झोपताना ‘या’ चुकांमुळे तुमचे केस कुरळे आणि तुटू शकतात

Hair Care – रात्री झोपताना ‘या’ चुकांमुळे तुमचे केस कुरळे आणि तुटू शकतात

प्रत्येकाला सिल्की मऊ केस हवे असतात आणि विशेषतः मुली त्यांच्या केसांबद्दल खूप पझेसिव्ह असतात. निरोगी केस तुमचे व्यक्तिमत्व देखील वाढवतात. केसांची काळजी घेताना, शॅम्पू, केसांचे तेल आणि कंडिशनर यासारख्या गोष्टी वापरतात, परंतु ते अनेकदा आपण लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे केस कुरळे, निर्जीव आणि केस तुटू शकतात.

केस गरम पाण्याने धुणे, गरम उपकरणांचा जास्त वापर, हार्श शाम्पू, कंडिशनर किंवा तेल न लावणे, सूर्यप्रकाशात राहणे आणि प्रथिनांची कमतरता यामुळे केस कुरळे, निर्जीव आणि केस तुटू शकतात. या व्यतिरिक्त, रात्री झोपताना केसांशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, अन्यथा केस कुरळे होऊ शकतात आणि तुटू शकतात. जाणुन घ्या केसांच्या संबंधित रात्री या चुका टाळल्या पाहिजेत.

कापसाच्या उशीचा वापर

तुम्ही कापसाच्या उशीचा किंवा विणलेल्या कापडाच्या उशीचा वापर केला तर त्यामध्ये तुमचे केस अडकू शकतात .

 

 

 

घट्ट केस बांधून झोपणे

तुम्ही दररोज घट्ट केस बांधले तर हे तुमच्या केसांना देखील नुकसान करते. रात्री  बांधलेले केस न सोडता झोपल्यास केसगळती अधिक प्रमाणात वाढते.

 

 

मोकळे केस ठेवून झोपणे 

तुमचे केस लहान असतील तर तुम्ही ते मोकळे ठेवून झोपता. पण केस लांब असतील तर मोकळे ठेवून झोपल्याने केस एकमेकांत गुंतू शकतात आणि केस गळती वाढू शकते.

 

ओल्या केसांनी झोपणे

ओल्या केसांनी कधीही का झोपू नये याची ९ कारणे - तज्ञांच्या घरगुती टिप्सबऱ्याच लोकांना रात्री आंघोळ करण्याची सवय असते. केस धुतले तर झोपण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे करावे. ओल्या केसांनी झोपल्याने तुमचे केसच खराब होत नाहीत तर डोकेदुखी आणि सर्दी सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

 

 

झोपताना केसांची काळजी घ्या

केस लांब असतील तर रात्री ते पूर्णपणे मोकळे ठेवण्याऐवजी किंवा घट्ट बांधण्याऐवजी सैल वेणी घाला.

कापसाच्या उशाऐवजी सिल्क किंवा सॅटिनच्या उशीचा वापर करा.

केसांना कव्हर करण्यासाठी तुम्ही सिल्कची टोपी देखील खरेदी करू शकता. ही टोपी घालून झोपल्याने केसांचे नुकसान टाळता येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
हात धुणे एक आवश्यक सवय आहे, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला वाचता येते. आपण जेवणापूर्वी किंवा टॉयलेटवरुन आल्यानंतर कोणाला स्पर्श केल्यानंतर...
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक
अमेरिकेला लढायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढू, १०० टक्के टॅरिफ लादल्यानंतर चीनचा इशारा
जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या, जिल्हा प्रशासनाच्या मेरीटाईम बोर्ड आणि प्रदूषण मंडळाला सूचना