कोकण रेल्वेच्या टीसीच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश; तुतारी एक्सप्रेस मधून पळून जाण्याचा कट उधळला

कोकण रेल्वेच्या टीसीच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश; तुतारी एक्सप्रेस मधून पळून जाण्याचा कट उधळला

केईएम रुग्णालयातून एका लहान मुलाला पळवून कोकण रेल्वेच्या तुतारी एक्सप्रेस मधून पळवून नेत असताना दादर स्थानकात टिसीच्या सतर्कतेमुळे त्या चिमुरड्याला वाचवण्यात यश आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर ते सावंतवाडी या रेल्वेगाडीत कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांना एक व्यक्ती एका लहान मुलाबरोबर आढळून आला. ती व्यक्ती संशयास्पद वाटत होती. त्या व्यक्तीचे मुलाबरोबरचे वागणे टीसी चव्हाण आणि अन्य प्रवाशांना संशयित वाटले. संदेश चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी त्या संशयित व्यक्तीची चौकशी सुरू केली. पण त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. यामुळे चव्हाण यांना ते मूल त्याचे नसून त्याने पळवून आणले आहे हा संशय अधिक बळावला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संदीप चव्हाण यांनी त्या व्यक्तीला धरून ठेवले आणि तात्काळ चालत्या ट्रेन मधूनच नियंत्रण कक्ष वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे यांना माहिती दिली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळे,वरिष्ट पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने ,सहाय्यक पोलिस निरीक्षक ताजने,आणि ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी सदर संशयित व्यक्तीला व त्याच्या कडील मुलाला ताब्यात घेतले. संशयित आरोपीचे नाव अमोल अनंत उदलकर वय 42,राहणार इंदील देवगड असे आहे.

चिमुरड्याला केईम रूग्णालयातून पळवले
हे त्याने मुल मुंबई केइम रुग्णालयातून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले.. या बाळाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आजीकडे असलेल्या या मुलाचे स अपहरण केले होते. आरोपीला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे या अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश आल्याने टीसी संदेश चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण रेल्वेमध्ये सेवा बजावताना दाखवलेल्या या सतर्कतेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी हि तात्काळ घेत संदेश चे विशेष कौतुक करत त्यांना पंधरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे.संदेश चव्हाण यांना कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
हात धुणे एक आवश्यक सवय आहे, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला वाचता येते. आपण जेवणापूर्वी किंवा टॉयलेटवरुन आल्यानंतर कोणाला स्पर्श केल्यानंतर...
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक
अमेरिकेला लढायचे असेल तर आम्ही शेवटपर्यंत लढू, १०० टक्के टॅरिफ लादल्यानंतर चीनचा इशारा
जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या, जिल्हा प्रशासनाच्या मेरीटाईम बोर्ड आणि प्रदूषण मंडळाला सूचना