पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /माद्रिद

येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या माद्रिद स्पेन मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूने चीन तैपेईच्या हुआंग यु सुनचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेतील गुरुवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने चीन तैपेईच्या 63 व्या मानांकित हुआंग यु सुनचा केवळ 36 मिनिटांच्या कालावधीत 21-14, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. माजी विश्वविजेत्या सिंधूने गेल्या वर्षी या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते. सिंधूचा पुढील फेरीतील सामना थायलंडची केटथाँग किंवा जपानची नात्सुकी निदायरा यापैकी एकीशी होईल. या स्पर्धेतून स्पेनची टॉप सिडेड कॅरोलिना मॅरिनने माघार घेतली आहे. तत्पूर्वी मॅरिनने अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा आणि स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. माद्रिद बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी सिंधू आतुरलेली आहे. 2022 साली झालेल्या सिंगापूर खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर तिला आतापर्यंत विश्व बॅडमिंटन टूरवरील एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;