जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात; विक्रमाची नोंद, प्रमाणपत्र बहाल
जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली. दोन फूट तीन इंच एवढी तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता International Book of records मध्ये झाली आहे.
ज्ञानेश्वरी गुणेदार असे या मुलीचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात परसोडी येथील रहिवासी आहे. काही युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची बघून त्यांना आश्चर्य वाटले. तिची विचारपूस केली, माहिती घेतली. उंची मोजली. तेव्हा लक्षात आले की, जिवंत असलेल्या व्यक्तींमध्ये तिची उंची जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्यामुळे तिची कुठेतरी नोंद व्हायला हवी आणि तिला ओळख प्राप्त व्हावी, या उद्देशाने त्या युवकांनी International Book of records कडे कागदोपत्री पाठपुरावा केला. त्यात त्यांना यश मिळाले. जरी तिची उंची जगात दुसऱ्या क्रमांकाची असली, तरी तिची नोंद जागतिक संस्थेने घेत तिला प्रमाणपत्र बहाल केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिला हे प्रमाणपत्र देण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List