मांजरा प्रकल्पातून 31651.89 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुच; सतर्कतेचे आवाहन
मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. आजही तब्बल 31651.89 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 29/09/2025 रोजी 7.00 वाजता गेट क्रमांक 1,2,3,4,5 व 6 (हे 4 गेट) 0.25 मीटरने कमी करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र. 1,2,3,4,5 व 6) 1.750मीटरने चालू असून मांजरा नदीपात्रात 31651.89 क्युसेक्स (896.40क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List