Jalna Rain – भोकरदन तालुक्यात मुसळधार पावसाचा धुडगूस! दहाही मंडळात अतीवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान

Jalna Rain – भोकरदन तालुक्यात मुसळधार पावसाचा धुडगूस! दहाही मंडळात अतीवृष्टी, पिकांचे प्रचंड नुकसान

भोकरदन तालुक्यातील दहाही मंडळात शनिवारी (27 सप्टेंबर 2025) दुपारी चार पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रात्रभर थैमान घातलं. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभं पीक आडवं झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच शहरातील काही ठिकाणी रहिवाशी भागातील घरांमध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भोकरदन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना रस्त्यावर असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे सर्वच दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास लाखो रुपयांचा फटका या पावसामुळे दुकान मालकांना बसला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील राजुर, हसनाबाद, पिंपळगाव रेणुका, सिपोरा बाजार, धावडा, अन्वा, आव्हाणा, केदारखेडा, जानेफळ दाभाडीसह भोकरदन भागातही मुसळधार पाऊस कोसळल्याने मका, सोयाबीन, कपाशी, तुरीसह अद्रक पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना पावसाचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;