Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर अपघात सत्र सुरूच, हातखंबा येथे कारला आग

Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर अपघात सत्र सुरूच, हातखंबा येथे कारला आग

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा टॅप रस्त्यावर सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणार्‍या कारचा अपघात झाला. मार्गफलक न दिसल्याने कारने अचानक रस्त्यावरील कठड्याला धडक दिली आणि गाडी रस्त्यावर पलटी होऊन जागेवरच पेटली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

डॉ. मिहिर मुरलीधर प्रभुदेसाई (39) हे आपल्या कारने रत्नागिरीत येत होते. हातखंबा- पाली परिसरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आला आहे. मात्र, चालकाला रस्त्यावरील मार्ग बदलाचा सूचना देणारा फलक दिसला नाही. यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील गाडी थेट समोर असलेल्या दगडाच्या कठड्यावर जोरदार आदळली. यानंतर गाडी जागेवरच पलटी झाली आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या अपघातात चालक डॉ. मिहिर प्रभुदेसाई जखमी झाले. तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याच्या सहाय्याने गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामुळे रत्नागिरी-पाली मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;