अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या बॅकवाटरमुळे धर्माबाद तालुक्यातील शेती पुर्णतः पाण्याखाली गेलेली आहे. असे असताना या भागाचे आमदार फिरकून पाहण्यास तयार नसल्याने रोशनगावच्या शेतकऱ्यांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वी धर्माबाद शहरात भीक मागो आंदोलन करुन लोकप्रतिनिधींचा निषेधही करण्यात आला होता.

नायगाव विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने धर्माबाद तालुक्यातील शेतातील पिकांचा चिखल झाला होता. प्रशासनाने दखल घेत पंचनामे केले, जिल्ह्याचे पालकमंत्री आले पण या भागाचे आमदार मात्र फिरकले नाहीत. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे जनावरांचे, पीकांचे, घरे व मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.
संतप्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने धर्माबाद शहरातील पानसरे चौकात लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ ‘भीक मागो’ आंदोलन करत असंवेदनशील लोकप्रतिनिधीच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला होता. तरीही पाझर फुटला नाही.

मागच्या दोन तीन दिवसापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून यामुळे धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव शिवारात आलेल्या पावसामुळे आणि प्रचंड पुरामुळे शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उभे पीक वाया गेले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून मदतीची कुठलीही ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी अखेर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

गावातील शेतकरी शेतीकडे जमले. या प्रसंगी त्यांनी “आमच्या शेतीचे झालेले प्रचंड नुकसान, गव्हाच्या जवळ असलेली शेती जल मय झाली, जनावरांसाठी चारा नाही, तरीही प्रशासन झोपले आहे. आम्हाला जगायचे की मरायचे याचा निर्णय घ्यावा” अशी संतापपूर्ण हाक दिली.
यावेळी गावातील युवा तरुण मंडळी व नागरिक तातडीने शेतकऱ्यांना समजावून आत्मदहनाचा प्रयत्न रोखला. मात्र शेतकऱ्यांनी आपली मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, रोशन गावातील शेतकऱ्यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाला प्रशासनासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;