Beed News – बीडच्या कपिलधार धबधब्याचे आक्राळ विक्राळ रूप

Beed News – बीडच्या कपिलधार धबधब्याचे आक्राळ विक्राळ रूप

बीड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर मांजरसुबा घाटा लगत असणार्‍या तीर्थ क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र कपिल धार च्या धबधब्याने शनिवारी झालेल्या पावसात रौद्र रूप धारण केले. दोन्ही धबधब्यातून पाणी अत्यंत तिव्रतेने कोसळत आहे.

बीड शहरापासून जवळच असलेल्या कपिलधार हे क्षेत्र मराठवाड्यात प्रसिद्ध श्री क्षेत्र आहे, कपिलधार येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले मन्मथ स्वामी यांची समाधी आहे. अगदी या समाधीस्थळा जवळच डोंगर कड्यातून दोन धबधबे कोसळत असतात. पावसाळ्यात या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मराठवाड्यातून पर्यटक कपिलधार येथे आवर्जून येत असतात, अत्यंत निसर्गरम्य वातावरण असलेले हे क्षेत्र गेल्या आठवडा भरापासून पर्यटकांसाठी दुर्लक्षित झाले आहे, कारण पावसाचा जोर वाढत असल्याने पर्यटकांची पाऊले मंदावली आहेत, जोरदार पावसामुळे कपिलधारचे निसर्गरम्य धबधब्याचे ठिकाण आता अक्राळ विक्राळ रूपात समोर येत आहे. भयभीत करणारे पाण्याचे लोट अन् धबधब्याचे रौद्र रूप सध्या दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;