भरपावसात श्री अंबाबाई-त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा

भरपावसात श्री अंबाबाई-त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा

शारदीय नवरात्रोत्सवातील परंपरेनुसार ललित पंचमीनिमित्त सकाळी दहाच्या सुमारास करवीर निवासिनी श्री अंबाबाई सोन्याच्या सजवलेल्या पालखीतून पारंपरिक लवाजम्यासह आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला बाहेर पडली.पाठोपाठ चांदीच्या पालखीतून श्री तुळजाभवानी माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरू महाराज वाडय़ातील गुरू महाराजांची पालखीही टेंबलाई टेकडीकडे लवाजम्यासह बाहेर पडली. मार्गात ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात स्वागत स्वीकारत दुपारी बाराच्या सुमारास या पालख्या टेंबलाई टेकडीवर दाखल झाल्या.

यावेळी छत्रपतींच्या माजी खासदार व युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती या शाही परिवाराच्या उपस्थितीत गुरव घराण्यातील स्वरा गुरव या कुमारिकेचे पूजन व तिच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी संपन्न झाला.

श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीचा विधिवत सोहळा संपन्न झाल्यानंतर पालख्या पुन्हा आपापल्या ठिकाणी रवाना झाल्या. त्र्यंबोली भेटीसाठी गजारूढ अंबारीतून श्री अंबाबाई निघते, या परंपरेनुसार श्री अंबाबाईची आज गजारुढ अंबारीतील सालंकृत पूजा बांधण्यात आली.

दरम्यान, आज सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पालखीसाठी नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. टेंबलाई टेकडीवरील देवींच्या भेटीसोहळ्यासह कोहळा फोडण्याच्या विधीला गर्दी कमी राहिल्याचे दिसून आले. तर यानिमित्त भरणाऱ्या जत्रेवरही याचा परिणाम दिसून आला.

पावसाचा श्री अंबाबाई, श्री जोतिबा मंदिरांतील गर्दीवर परिणाम

नवरात्रोत्सवामुळे सर्व मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरातही दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. मात्र, शुक्रवारी (दि. 26) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने आज पहाटेपासूनच जोर धरला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर सर्वत्र रात्री उशिरापर्यंत मुसळधार आणि संततधार पाऊस झाला.त्यामुळे जनजीवनासह मंदिरातील गर्दीवरही परिणाम दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;