Navratri 2025 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक कमलादेवी पोषाखासह अलंकार परिधान

Navratri 2025 – श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक कमलादेवी पोषाखासह अलंकार परिधान

घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सहाव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस कमलादेवी पोषाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगन जोड, मोत्याची कंठी दोन पदरी, शिरपेच मोठा मस्त्य जोड, पदकासह लॉकेट, अष्टपैलू मण्याची कंठी, तोडे जोड, एकदाणी, सूर्यकळ्याचा हार, तांदल्या हार ७ पदरी, पट्टीसह लॉकेट, तुळशीची माल १ पदरी, दंड्पेठ्या जोड मोठा इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, हिऱ्याची नथ, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचा कंगन मोठा, चिंचपेटी हिरवी, मस्त्य जोड, चंद्र, पैजनजोड, कर्णफुले जोड, रूळ जोड, तानवड जोड, मण्यां मोत्याच्या पाटल्या, नवरत्नाचा हार,खड्याची वेणी, सोनाचे बाजूबंद पाचूची गरसोळी, पेट्याची बिंदी, बाजीराव गरसोळी, ठुशी, तारामंडळ इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच राधिका मातेस मोत्याचा कंठा, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, व सत्यभामादेवीला जवेची माळ, चिंचपेठी तांबडी, जवमानी पदक, लक्ष्मीहार मोहरांची माळ इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.

तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई – तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;