लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला, नगर-दौंड महामार्गावरील घटना

लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला, नगर-दौंड महामार्गावरील घटना

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. नगर-दौंड महामार्गावरील हॉटेल सारंगजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात गाड्यांची काच फुटली असून एका कार्यकर्त्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे नियोजित कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी नगर-दौंड महामार्गावर अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

‘हा हल्ला कोणी केला हे मला माहिती नाही. पण आमच्या दोन गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. गाडीत असलेला एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. याआधी माझ्यावर सात-आठ वेळा हल्ले झालेले आहेत. मी पोलिसांना देखील आधीच सांगितले होते. पण आता मी काही बोलणार नाही. सरकारला आम्ही वारंवार सांगितले, आता बोलून काही उपयोग नाही’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया हाके यांनी दिली.

लक्ष्मण हाकेंवर चप्पलफेक!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;