लातूर जिल्ह्यात 24 तासात 75.3 मिलिमीटर सरासरी पाऊस, सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात

लातूर जिल्ह्यात 24 तासात 75.3 मिलिमीटर सरासरी पाऊस, सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात

लातूर जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. मागील 24 तासात लातूर जिल्ह्यात 75.3 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 60 महसूल मंडळापैकी तब्बल 37 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून सर्वाधिक 137 मिलिमीटर पावसाची नोंद अहमदपूर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 163.5 मिलिमीटर पाऊस सुतालीबंद आणि हाडोळती महसूल मंडळात झाला आहे.

लातूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील शंभर वर्षात झाला नाही असा पाऊस लातूर मध्ये झाला आहे. रात्री लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्यामुळे आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.

जिल्ह्यातील तालुका निहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे 
लातूर तालुका 59 मिलिमीटर, औसा तालुका 54.8 मिलिमीटर ,अहमदपूर तालुका 137 मिलिमीटर, निलंगा तालुका 53.7 मिलिमीटर , उदगीर तालुका 99.1 मिलिमीटर ,चाकूर तालुका 94.8 मिलिमीटर रेणापुर तालुका 62.6 मिलिमीटर, देवणी तालुका 57.7 मिलिमीटर , शिरूर अनंतपाळ तालुका 61.3 मिलिमीटर , जळकोट तालुका 77.6 मिलिमीटर सरासरी पाऊस झालेला आहे.

लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळापैकी तब्बल 37 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात नोंदवला गेला असून अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर महसूल मंडळात 132.3 मिलिमटर पावसाची नोंद झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;