लातूरमध्ये निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 12 दरवाजे उघडले

लातूरमध्ये निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 12 दरवाजे उघडले

लातूर मधील माकणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज निम्न तेरणा प्रकल्पाचे एकूण 12 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. तेरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सद्यःस्थितीत एकूण 12 वक्रद्वारे 30 सेंटिमीटरने विसर्ग सुरू असून एकूण 13672 क्यूसेक्स (387.168) क्यूमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.

रेणापूर मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला

दुसरीकडे रेणापूर प्रकल्पातही विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज पहाटे 5:30 वाजता रेणापूर प्रकल्पाचे एकूण चार दरवाजे उघडण्यात आले असून रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत एकूण दोन वक्रद्वारे 40 सेंटीमीटरनी व 02 वक्रद्वारे 30 सेंटीमीटर नी उघडण्यात आली असून एकूण 4371.38 क्युसेक (123.80cumecs) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

 

मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला
लातूर जिल्ह्यातील जोरदार पाऊस आणि मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी पाहून मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सहा वक्र दरवाजे उघडले असून मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 7.15 वाजता गेट क्रमांक 1 2,3,4,5 व 6 (हे 6 गेट) 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत. 22982.60 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

मांजरा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला
मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. 32970.65 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 8.30 वाजता गेट क्रमांक 1 व 6 (हे 2 गेट) 0.50 मीटरने आणि गेट क्रमांक (2,3,4 व 5) 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत. मांजरा धरणाच्या सांडव्याची 4 वक्रद्वारे (क्र. 2, 3, 4 व 5) 1.75 मीटरने आणि 2 वक्रद्वारे (क्र. 1 व 6) 2.00 मीटरने चालू असून मांजरा नदीपात्रात 32970.65 क्युसेक्स (936.40क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;