धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी शेतीत घुसल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. घरं-दारं, जनावरं वाहून गेली असून पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी पुन्हा वाढत असून कळंब तालुक्यातील संजीतपूर या ठिकाणी असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तसेच परिसरातील शेतामध्येही गुडघ्याएवढे पाणी साचले आहे.

हवामान खात्याच्या वतीनेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून धाराशिवला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पडत असलेला पावसाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;