‘जिंदगी इम्तिहान लेती है’ गाण्याचे गायक काळाच्या पडद्याआड, कलाविश्वातून वाईट बातमी

‘जिंदगी इम्तिहान लेती है’ गाण्याचे गायक काळाच्या पडद्याआड, कलाविश्वातून वाईट बातमी

मुकेश यांचा आवाज म्हणून ओळखलाे जाणारे प्रसिद्ध गायक कमलेश अवस्थी यांचं निधन झालं आहे. अहमदाबाद येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवस्थी यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘तेरा साथ है तो..’, जिंदगी इम्तिहान लेती है अशी अनेक सुपरहिट गाणी कमलेश अवस्थी यांनी गायली होतीत.

कमलेश अवस्थी यांचा जन्म1945 मध्ये सावरकुंडला येथे झाला होता. भावनगर विद्यापीठातून एम.एस्सी. आणि पीएचडीचे शिक्षण घेतलं होतं. भावनगरमधीलच सप्तकला येथे त्यांनी आपल्या गायन क्षेत्रातील कारकिर्दीला सुरूवात केली होती. कमलेश अवस्थी यांनी पहिला म्युझिक अल्बम ‘ट्रिब्युट टू मुकेश’ रिलीज केला होता.

हिंदी चित्रपट त्यासोबतच गुजराती चित्रपटांमध्ये गायलेल्या गाण्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले. दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या ‘गोपीचंद जासूस’ या शेवटच्या चित्रपटामध्ये कमलेश यांनी पार्श्वगायन केलं होतं. यावेळी राज कपूर यांनी देशाला मुकेश परत मिळाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर व्हॉईस ऑफ मुकेश म्हणून त्यांची ओळखच झाली होती. मुकेश यांनीही अनेक गुजराती गाण्याला आवाज दिला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;