पेरलेल्या बियाण्यासह स्वप्नही वाहून गेले, एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले!

पेरलेल्या बियाण्यासह स्वप्नही वाहून गेले, एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले!

गरिबीमुळे आधीच कर्ज काढून कसेबसे पेरलेले बियाणेही अतिवृष्टीत वाहून गेल्यामुळे स्वप्नभंग झालेल्या दोन शेतकऱयांनी आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात घडल्या आहेत. शरद गंभीर आणि काशीनाथ गवसाने अशी या शेतकऱयांची नावे आहेत. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱयांवर अस्मानी संकटच ओढवले आहे. दरम्यान, आत्महत्यांमुळे घरातील कर्ता माणूसच गेल्याने संबंधित कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने सर्व प्रकारची मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

…आणि गळफास घेऊन जीवन संपवले

 कारी गावातील शरद गंभीर (45) यांनी कर्ज काढून साडेतीन एकर जमिनीत लिंबाची बाग केली, मात्र अतिवृष्टीमुळे ही बाग नष्ट झाली. त्यांच्या डोक्यावरील एकूण दहा लाखांचे कर्ज फेडणार कसे या चिंतेमधून त्यांनी दावणीने गळफास घेतला.

 दहिटणे गावातील काशीनाथ गवसाने (58) या अल्पभूधारक शेतकऱयाने दीड एकर जागेत कोरडवाहू शेती केली होती, मात्र अतिवृष्टीने सर्व पीक नष्ट झाले. त्यामुळे कर्जफेड करणार कशी या विवंचनेत झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;