कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बांदा येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर 62 गुन्हे दाखल आहेत. अन्सारी याच्या मृत्युनंतर उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अन्सारी याची तब्येत सोमवारी रात्री अचानत तब्येत बिघडली आणि तुरुंग प्रशासनात एकच गोंधळ उडाला. अन्सारी याच्या ओटीपोटात दुखत असल्याने त्याला तत्काळ राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.

सोमवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास मुख्तार अन्सारीची अचानक तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. मुख्तारने त्याला जीवे मारण्याचा तसेच त्याच्या जेवणात स्लो पॉयझन दिले जात असल्याचा आरोप केला होता. मागच्या वेळेला मुख्तार अन्सारी याच्या सुरक्षेत केलेल्या हलगर्जीपणा तुरुंग अधिकाऱ्यासह तुरुंग उपाधिकाऱ्याचेही निलंबन करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किनवटच्या भाजी मार्केटमध्ये पतीने पत्नीला पेटविले किनवटच्या भाजी मार्केटमध्ये पतीने पत्नीला पेटविले
किनवट शहरालगतच्या गोकुंदा परिसरातील दत्तनगरातील एका युवकाने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना किनवट पालिकेच्या भाजी...
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभा निवडणुकीआधी संभाजीनगरमध्ये राडा आणि हाणामारी, पाहा व्हिडीओ
राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावून फाईल… विजय वडेट्टीवार यांचा आरोप काय?
गांधींनी इंग्रजांना घालवलं, मोदी काय चीज आहे?; शरद पवार यांचा हल्लाबोल
महाराष्ट्राने बंड केलं तर तुम्हाला गुजरातमध्येही राहणं मुश्कील होईल, संजय राऊत यांचा घणाघात
पहिल्याच नजरेत पडला प्रेमात, 4 महिने केले डेट, अब्दू रोजिकने लव्ह स्टोरीबद्दल केला खुलासा, म्हणाला, कमी उंची..
दोन बायका, चार लेकरं, आता तिसरे लग्न करणार प्रसिद्ध युट्यूबर? थेट कॅमेऱ्यासमोरच..