शुभमन गिल आता ‘बोलर्स’चा ॲम्बेसेडर

शुभमन गिल आता ‘बोलर्स’चा ॲम्बेसेडर

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिलला अलाना कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (ACPL)च्या अलाना पेट सोल्यूशन्स (APS) विभागाने आपल्या प्रमुख डॉग न्यूट्रिशन ब्रँड बोलर्सचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जाहीर केले आहे. या निमित्ताने एक उत्कृष्ट खेळाडू, विज्ञानाधारित आणि उच्च-गुणवत्तेच्या पाळीव प्राणी न्यूट्रिशन ब्रॅण्डशी जोडला गेला आहे. या नव्या भागीदारीमधून बोलर्सने भारतातील पेट न्यूट्रिशन क्षेत्रात नवा टप्पा गाठला आहे.

आज पाळीव प्राणी हे केवळ साथीदार न राहता घरातील कुटुंबातील सदस्य झाले आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी योग्य व संतुलित आहाराची गरज वाढत चालली आहे. शुभमन गिलसारखा शिस्त आणि उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक असलेला क्रिकेटपटू या ब्रँडसोबत आल्यामुळे पाळीव प्राण्यांच्या पालकांना योग्य पोषणाचे महत्त्व पटवून देण्यास मोठी मदत होणार आहे. याबाबत अलाना पेट सोल्यूशन्सचे बिझनेस हेड नितीन कुलकर्णी म्हणाले, “हिंदुस्थानमध्ये पाळीव प्राण्यांची संख्या जलद गतीने वाढत आहे, विशेषतः टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर प्रीमियम, विज्ञानाधारित डॉग न्यूट्रिशन सहज उपलब्ध करून देण्याची मोठी संधी आहे. शुभमन गिल तरुणांमध्ये लोकप्रिय असून त्याची ओळख बॉलर्सला नव्या पाळीव प्राणी पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या सहयोगामुळे बोलर्स ब्रँडला अधिक विश्वासार्ह आणि वेगळे स्थान मिळवण्यास मदत होईल.”

बोलर्सने गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील उपक्रमांद्वारे पाळीव प्राणी पालकांना जोडून ठेवले आहे. #TasteThatMakesYourDogFly सारख्या उपक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता शुभमन गिलच्या सहकार्यामुळे डिजिटल प्रसार मोहिमा, प्रादेशिक कार्यक्रम आणि ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद यांद्वारे ब्रँडची ओळख आणखी मजबूत केली जाणार आहे. बोलर्सच्या उत्पादनांमध्ये पिल्लांसाठी, प्रौढ आणि मोठ्या प्रजातींसाठी संतुलित ड्राय व वेट फूड तसेच उच्च-प्रोटीन ट्रीट्स आणि मीट बार्सचा समावेश आहे. शुभमन गिलसोबतच्या या सहयोगामुळे बोलर्सचा राष्ट्रीय स्तरावरील विस्तार, अधिक जागरूकता आणि पाळीव प्राणी पालकांशी दीर्घकालीन विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा टप्पा गाठला जाईल.

याशिवाय परफेटो हा APSचा खास मांजरींच्या पोषणासाठीचा ब्रँड असून त्यामुळे APS एक सर्वसमावेशक पेट न्यूट्रिशन कंपनी म्हणून उभी आहे. तेलंगणातील जहीराबाद येथे असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या स्वयंचलित पेट फूड उत्पादन प्रकल्पामुळे गुणवत्ता, सुरक्षितता आणि सातत्य टिकवले जाते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार केलेल्या त्यांच्या फॉर्म्युलेशन्स भारतीय हवामान आणि पाळीव प्राण्यांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;