ललिता पंचमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 22 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून शुक्रवारी पाचव्या माळेच्या दिवशी ललिता पंचमी निमित्त रथ अलंकार महापूजा संपन्न झाली. या वेळी भाविकांनी मोठ्या उत्साहाने देवीचे दर्शन घेतले. धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला होता. त्या परंपरेतून आजही रथ अलंकार अवतार पूजेला विशेष महत्व आहे.
चौथ्या माळेच्या दिवशी गुरुवारी मोर वाहनावरून श्री तुळजाभवानी देवींची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शारदीय नवरात्र उत्सवाच्या उर्वरित दिवसांत दररोज वेगवेगळ्या वाहनांवरून देवीची छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून भाविकांना या सोहळ्याचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List