आम्ही गोट्या खेळायला आलो का! कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यावर अजित पवार चिडले

आम्ही गोट्या खेळायला आलो का! कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यावर अजित पवार चिडले

धाराशीव जिह्यात पाहणी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीबाबत शेतकऱयाने प्रश्न विचारताच त्याच्यावर संतापले आणि त्यांचा तोल गेला. आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलो का, असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्याला झापले.

अजित पवार परंडा तालुक्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी एका तरुण शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली. त्यावर ‘याला द्या रे मुख्यमंत्रीपद. सकाळी सहाला सुरुवात केलीय मी… आम्हालाही कळतं. लाडक्या बहिणींना वर्षाला 45 हजार कोटी देतोय. अरे बाबा, सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.’  असे सांगत अजित पवार यांनी या शेतकऱ्याची मागणी धुडकावली.

राजकारण कशाला करता! मुख्यमंत्री शेतकऱ्यावर चिडले

औसा तालुक्यातील उजनी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही एका शेतकऱ्यावर चिडले. ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी द्या, अशी या शेतकऱ्याची मागणी होती. मात्र, ‘ये दादा गप्प बस, राजकारण करू नकोस’ असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, आम्ही राजकारणी नाही, शेतकरी आहोत. तुम्हाला प्रश्न विचारणं चूक आहे का, असा सवाल या शेतकऱ्याने केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;