परिणीती चोप्राने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडले मौन, तीन ओळीत सांगितले सर्व काही

परिणीती चोप्राने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडले मौन, तीन ओळीत सांगितले सर्व काही

अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या प्रग्नेंट असल्याची सध्या चर्चा आहे. गुरुवारी सकाळी ती विमानतळावर पफर जॅकेटमध्ये दिसली होती. तेव्हापासून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झालीये. अभिनेत्रीने सप्टेंबर २०२३ मध्ये आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत विवाह केला होता. आता मुंबईत ती पफर जॅकेटवर दिसल्याने तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की ती गरोदर आहे. परिणीती सध्या ‘चमकिला’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये दिलजीत दोसांझ आणि दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत काळ्या कफ्तान ड्रेसमध्ये पोहोचली होती, ज्यानंतर लोकांमध्ये पुन्हा ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली. परिणीतीने स्वतः तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर आनंद लुटला आहे.

काय म्हणाली परिणीती चोप्रा

परिणीती चोप्राचा पोशाख आणि ती ज्या प्रकारे पोटाला स्पर्श करत होती त्यामुळे हा अंदाज लावला जात आहे. मात्र, अभिनेत्रीने आता या अफवांचे अत्यंत गमतीशीरपणे खंडन केले आहे. परिणीतीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली ज्यामध्ये तिने हसत हसत इमोजीसह लिहिले की, ‘काफ्तान ड्रेस = गर्भधारणा, ओव्हरसाइज शर्ट = गर्भधारणा, आरामदायक कुर्ता = गर्भधारणा.’

‘चमकिला’चा ट्रेलर लॉन्च

दरम्यान, चित्रपटाच्या कलाकारांसह चमकीला सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. अमर सिंह चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत चमकीला यांच्या जीवनावर आधारित ‘चमकिला’ सिनेमा बनवला गेला आहे. दिलजीत आणि परिणीती या दोघांनीही काही पंजाबी गाण्यांना आवाज दिला आहे. ए आर रहमानने त्याला संगीत दिले आहे. अमरजोतच्या पात्रात येण्यासाठी परिणीतीने 15 किलो वजनही वाढवले ​​होते.

‘चमकिला’ची कथा आणि रिलीज डेट

‘चमकिला’ यांना पंजाबचा एल्विस प्रेस्ली म्हटले जाते. दुर्दैवाने, एका परफॉर्मन्सची तयारी करत असताना, पंजाबमधील मेहसमपूरमध्ये तो आणि त्याची पत्नी अमरजोत यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने चमकिलाचे आयुष्य संपले. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी घटनास्थळावरून त्वरीत पलायन केले असून या प्रकरणाचा अद्यापही उलगडा झालेला नाही. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;