Latur News – आम्हाला तुटपुंजी मदत नको, सरसकट पंचनामे करा; पैशाचे बंडल तहसिलदारांच्या अंगावर फेकत सरपंचाने केला सरकारचा निषेध

Latur News – आम्हाला तुटपुंजी मदत नको, सरसकट पंचनामे करा; पैशाचे बंडल तहसिलदारांच्या अंगावर फेकत सरपंचाने केला सरकारचा निषेध

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अतिवृष्टी होऊन दहा महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. सरसकट पंचनामे सरकार करत नाही, असा आरोप करत माकणी थोर येथील सरपंच राहूल माकणीकर यानी निलंग्याचे तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अंगावर पैशाचे बंडल फेकून सरकारचा निषेध केला आहे.

बुटाला चिखलही लागू नये म्हणून महामार्गा जवळ असलेल्या शेतीच्या पाहणीची नौटंकी! मिंधे गटाच्या मंत्र्याला संतप्त शेतकऱ्यांचा घेराव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औराद शाहजानी येथील तेरणा व मांजरा संगमावर जावून नुकसानीची व पूर पहाणी केली. परंतु ठोस असे अश्वासन न दिल्यामुळे व निलंगा तालुक्यातील दहा मंडळा पैकी तीनच मंडळ सरसकट नुकसानभरपाईमध्ये घेत आहे. आम्हाला तुटपुंजी मदत नको, असा संताप व्यक्त करत माकणी थोर येथील सरपंच राहूल माकणीकर यांनी तससिलदार यांच्या दालनात जावून पैशाचे बंडल तहसिलदाराच्या अंगावर फेकले व सरकार व महसूल प्रशासन यांचा जाहीर निषेध केला, असे सरपंच राहूल माकणीकर यांनी सांगितले. नुकसानभरपाईमध्ये सरकार व महसूल प्रशासन दुजाभाव करतंय, असा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल, सातबारा कोरा करण्याची मागणी

यानंतर सरपंचावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलिस सुधीर सुर्यवंशी करत आहेत. तहसिलदारांच्या अंगावर पैशाचे बंडल टाकल्यामुळे निलंगा तहसिल अंतर्गत सर्वच तलाठी मंडळातील तलाठी मंडळअधिकारी यांनी दोन दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे. परंतु तात्काळ पोलिसांनी सरपंच राहूल माकणीकर यांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे. तरी देखील काम बंदची पुकार महसूल प्रशासनाने करणे योग्य नाही, असा आरोप जानकार मंडळीतून होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;