रील बनवताना मित्रांचा तोल गेला, 9 जण नदीत पडले; 5 जणांचा मृत्यू

रील बनवताना मित्रांचा तोल गेला, 9 जण नदीत पडले; 5 जणांचा मृत्यू

रीलसाठी तरुणाईचे नको ते धाडस जीवावर बेतत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. नदीच्या किनारी 9 मित्र रील बनवत असताना सर्वजण पाण्यात पडले. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत सर्व तरुणांना पाण्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी पाच तरुणांना मृत घोषित केले. चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वजण अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत.

बिहारच्या गयाजीमध्ये गुरुवारी ही घटना घडली. अकरावी आणि बारावीत शिकणारे 9 मित्र कॉलेजवरून घरी परतत होते. यादरम्यान नदी पुलावर उभे राहून सर्वजण रील बनवत होते. रील बनवताना सर्वांचा तोल गेला आणि ते नदीत पडले. सर्वजण खोल पाण्यात बुडू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तरुणांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनी सर्वांना बाहेर काढले. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;