Ahilyanagar News – कर्जमाफी करा, कर्जमाफी करा! जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणली, राम शिंदे व मंत्री विखेंसमोर जोरदार मागणी

Ahilyanagar News – कर्जमाफी करा, कर्जमाफी करा! जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणली, राम शिंदे व मंत्री विखेंसमोर जोरदार मागणी

जिल्हा सहकारी बँकेच्या 68व्या सर्वसाधारण सभेत आज शेतकऱ्यांच्या असंतोषाचा ज्वालामुखी फुटला. “कर्जमाफी करा, कर्जमाफी करा!” अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी थेट उठाव केला. “आमचे प्रचंड नुकसान झाले आहे, आधी कर्जमाफी द्या!” अशी हाक देत शेतकरी विखे यांच्या भाषणातच घुसले.

द्रुतगतीमुळे अहिल्यानगरचा रेल्वे प्रवास झाला सुपरफास्ट! वांबोरी ते राहुरी रेल्वे चाचणी यशस्वी, ताशी 125 कि.मी. वेगाने धावली रेल्वे

जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँकेबद्दल चिंता व्यक्त केलेली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये तोच धागा पकडला. आणि शरद पवार यांचे नाव न घेता जाणता राजाला बँकेची चिंता करायची आवश्यकता नाही. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत, असे म्हटले. यावेळी सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी अगोदर आम्हाला न्याय द्या, असे म्हणत त्यांनी विखे यांच्या भाषणादरम्यान कर्जमाफी द्या, कर्जमाफी द्या, अशी मागणी लावून धरली.  दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी आम्ही नियमित कर्ज भरून सुद्धा आम्हाला एक दमडीही मिळाली नाही. त्याचं काय? असा सवाल उपस्थित केला.

गोंधळामुळे खुद्द पालकमंत्री विखे यांनाही माघार घ्यावी लागली. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीशी सूर जुळवत, “तुमची जी मागणी आहे, तीच माझीही मागणी आहे. कर्जमाफी दिलीच पाहिजे” असे जाहीर वक्तव्य करावे लागले.

Ahilyanagar News – पावसाने दाणादाण उडवली; 423 गावे बाधित, 84 हजार 860 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

दुसरीकडे, सभापती आमदार राम शिंदे यांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले. राज्य सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे वास्तव शिंदेंना कबूल करावे लागले. “खरंच काहींना लाभ मिळाला नाही, काहींनाच मिळाला आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे” अशी स्पष्ट कबुली शिंदे यांनी दिली.

सभेत शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला. “आम्ही नियमित कर्जफेड केली तरी, आम्हाला एक दमडीही मिळाली नाही. पन्नास हजार मिळणार म्हणाले, तेही मिळाले नाही” असा प्रश्नांचा भडीमार केला. परिणामी संपूर्ण सभागृह घोषणांनी दणाणले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;