ताडोबातील व्याघ्रदर्शन महागले, सुधारित शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू

ताडोबातील व्याघ्रदर्शन महागले, सुधारित शुल्क 1 ऑक्टोबरपासून लागू

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी महागली आहे. व्यवस्थापन कोट्याअंतर्गत सुधारित सफारी शुल्क १ ऑ क्टोबरपासून लागू केले जाणार आहे. त्यामुळे ताडोबाची सफारी आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.

सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पर्यटकांना खुणावत असतो. देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटकदेखील या व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. कोअर क्षेत्रच नाही, तर बफर क्षेत्रातही अलीकडे सहज व्याघ्रदर्शन होत आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटनाची दारे खुली होत आहेत. मात्र, त्याचवेळी पर्यटकांना नव्या सफारी शुल्कासह या व्याघ्र प्रकल्पात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

नवे शुल्क याप्रमाणे –

  • ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क ४ हजार ६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क सातशे रुपये व वाहन शुल्क ३३०० रुपये असे एकूण ८६०० रुपये शुल्क.
  • शनिवार आणि रविवारी कोअर क्षेत्रात प्रवेश शुल्क ८६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये, वाहन शुल्क ३३०० रुपये असे एकूण १२ हजार ६०० रुपये करण्यात आले आहे.
  • बफर क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार प्रवेश शुल्क ३६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क ३ हजार रुपये असे एकूण ७३०० रुपये आकारले जाणार आहे.
  • शनिवार व रविवारी प्रवेश शुल्क ६६०० रुपये, मार्गदर्शक शुल्क ७०० रुपये व वाहन शुल्क ३ हजार रुपये असे एकूण १०,३०० रुपये आकारले जाणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;