ऑस्ट्रेलियात यंग इंडियाचा विजयी डंका, सूर्यवंशी, मल्होत्रा आणि कुंडूचा झंझावात; हिंदुस्थानच्या युवा संघाने जिंकली मालिका

ऑस्ट्रेलियात यंग इंडियाचा विजयी डंका, सूर्यवंशी, मल्होत्रा आणि कुंडूचा झंझावात; हिंदुस्थानच्या युवा संघाने जिंकली मालिका

एकीकडे टीम इंडिया आशिया कप गाजवतेय तर दुसरीकडे यंग इंडियाने ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घातलाय. वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी झंझावाती सत्तरी करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकत आपला डंका वाजवला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या दौऱयात हिंदुस्थानी युवा संघाने जोरदार सुरूवात करताना पहिल्या वन डेतही यजमानांचा 117 चेंडू आणि 7 विकेटनी धुव्वा उडवला होता. आता त्याच विजयाची पुनरावृत्ती दुसऱया सामन्यातही करण्यात आली. पहिल्या सामन्यातही वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडू यांनी सहा षटकारांचा पाऊस पाडला होता, तर या सामन्यात आठ षटकार ठोकले. कुंडूने या सामन्यात 87 धावांची घणाघाती खेळी केली होती. तेव्हा वैभवनेही 22 चेंडूंत 38 धावा चोपल्या होत्या. आता दुसऱया सामन्यात अपेक्षेप्रमाणे कर्णधार आयुष म्हात्रे (0) लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर सूर्यवंशीने विहान मल्होत्राच्या साथीने 117 धावांची भागी रचली.  दोघांनीही आक्रमक प्रत्येकी 70 धावा केल्या. दोघांनी मिळून 7 षटकारांसह 12 चौकार खेचले. त्यानंतर अभिज्ञान कुंडूने 71 धावांचा वर्षाव करत संघाला त्रिशतकासमीप नेले. बरोबर 300 धावांवर यंग इंडिया बाद झाली.

जेडन ड्रेपरने ठोके वाढवले

हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जोरदार धक्के दिले. त्यांचा एकही आघाडीचा फलंदाज फार काळ टिकला नाही. त्यामुळे 30 षटकांत 6 बाद 109 अशी मजल मारणारा ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला होता. त्याचा पराभव समोर उभा होता. मात्र तेव्हाच सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेडनने हिंदुस्थानी गोलंदाजीला फोडून काढण्याचे धाडस दाखवत सामन्याचा थरार वाढवला. त्याने सहा षटकार आणि आठ चौकारांचा वर्षाव करत 65 चेंडूंतच शतक साकारले. तेव्हा विजय ऑस्ट्रेलियाच्या आवाक्यात आला होता. पण 43 वे षटक निर्णायक ठरले. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या आयुष म्हात्रेने आपल्या पहिल्याच षटकात ड्रेपरची विकेट काढत हिंदुस्थानी संघाच्या जिवात जीव आणला. तेव्हा ऑस्ट्रेलियाला 44 चेंडूंत 80 धावांची गरज होती. पण जेडन बाद होताच ऑस्ट्रेलिया पुन्हा बॅकफूटवर पडला. पुढे म्हात्रेने आर्यन शर्मा आणि हेडन शिलरचीही विकेट काढत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव 47.2 षटकांत 249 धावांवर संपला आणि हिंदुस्थानच्या युवा संघाने सामन्यासह मालिकेतही 2-0 अशी आघाडी घेतली. आता औपचारिकता असलेला तिसरा सामना शुक्रवारी खेळला जाईल.

सूर्यवंशीने मोडला षटकार विक्रम

‘षटकाराची मशीन’ असलेल्या वैभवने या सामन्यात चक्क सहा षटकार मैदानात भिरकावले आणि युवा वन डे सामन्याच्या इतिहासात सर्वाधिक 38 षटकारांचा उन्मुक्त चंदचा विक्रमही मोडीत काढला. आता वैभव 41 षटकारांसह टॉपवर आहे. वैभवचा टी-20 आणि वन डे क्रिकेटमध्ये षटकारांचा तुफान वेगाने वाढतच चालला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;