Beed News – ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने मदत द्या, कर्जमाफी द्या…; सरकार विरोधात शेतकर्‍यांचा आक्रोश

Beed News – ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने मदत द्या, कर्जमाफी द्या…; सरकार विरोधात शेतकर्‍यांचा आक्रोश

अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला झोडपून काढले. पूर परिस्थिती निर्माण झाली. पिके, शेत पाण्यात बुडाले. पिके वाहून गेली, शेती खरडून निघाली. जमिनीत मातीऐवजी शेवाळ राहिले. शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर असताना सरकारने धीर आणि दिलासा देण्याऐवजी हतबल शेतकर्‍यांची चेष्टा करण्याचे काम केले. नुकसान लाखोचे आणि सरकारची मदत सात-आठ हजार टिकल्यांची. यामुळे अचानक शेतकर्‍यांमध्ये संताप झाला आणि जरूड फाट्यावर ठिय्या मांडत आक्रोश व्यक्त केला.

Latur Flood – भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फडणवीसांचा पाहणी दौरा! शेतकऱ्यांची निवेदने न स्वीकारताच निघून गेले

अतिवृष्टी आणि पुराने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून शेतकर्‍यांना मोठी अपेक्षा होती. सरकार मदतीचा हात देईल, असा विश्वास असताना राज्य सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा केली. सात हजार रुपये देवून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याने बळीराजा संतप्त झाला आहे. असंख्य गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून आक्रोश व्यक्त केला. जरूड फाट्यावर निदर्शने करत हजारो शेतकर्‍यांनी प्रशासनाला जाब विचारला. हेक्टरी ५० हजार रूपये तातडीने मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या, कांद्याच्या पिकाला वेगळी नुकसान भरपाई द्या, अशा मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले.

पुरात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने जीवन संपवले, एकीकडे उपमुख्यमंत्री पाहणी करत असताना दुसरीकडे शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;