बळजबरीनं स्पर्श, घाणेरडे मेसेज अन्… स्वामी चैतन्यानंद सरस्वतींवर 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

बळजबरीनं स्पर्श, घाणेरडे मेसेज अन्… स्वामी चैतन्यानंद सरस्वतींवर 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

राजधानी दिल्लीतील एका नामांकित आश्रमामध्ये 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसंतु कुंज येथील ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’चे माजी प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी यांच्यावर 17 विद्यार्थिनींनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी बळजबरीने स्पर्श करत घाणेरडे मेसेच पाठवल्याचा आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी 4 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

कर्नाटकातील श्रुंगेरी येथील दक्षिणान्मय श्री शारदा पीठ ही दिल्लीतील संस्था चालवते. या संस्थेने एक परिपत्रक जारी करत स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली. स्वामी चैत्यन्यानंद यांचे वर्तन आणि कृत्य हे बेकायदेशीर व पीठाच्या हिताविरुद्ध होते. त्यांचा आणि पीठाचा कोणताही संबंध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा ‘श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट’चा माजी प्रमुख होता. ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत संस्थेत पीजीडीएमचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा त्याने लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. आरोपी विद्यार्थिनींच्या ग्रुपवर घाणेरडे मेसेज पाठवत होता. तसेच बळजबरीने स्पर्श करत त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचाही प्रयत्न करत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;