समृद्धी महामार्गावर सौरऊर्जा प्रकल्प, 5 मेगावॅट वीजनिर्मितीस प्रारंभ; देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प

समृद्धी महामार्गावर सौरऊर्जा प्रकल्प, 5 मेगावॅट वीजनिर्मितीस प्रारंभ; देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या वाशीम येथील कारंजालाड व बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सौरऊर्जा निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.

नागपूर व मुंबईला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या  701 कि.मी. लांबीच्या द्रुतगती मार्गावरून आतापर्यंत सव्वा दोन कोटींहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे.

उत्पन्नाचा  नवीन स्रोत

पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गावरील वाशीम येथील तालुका कारंजालाड व बुलढाण्यातील तालुका मेहकर येथे सौरऊर्जा प्रकल्पाची क्षमता 9 मेगावॅट आहे. त्यापैकी कारंजालाड येथील 3 मेगावॅट व मेहकर येथील प्रकल्पातून 2 मेगावॅट वीज निर्मितीस सोमवारी प्रारंभ झाला. सौरऊर्जा निमितीच्या माध्यमातून महामंडळाला पथकराव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवीन स्रोत उपलब्ध झाला आहे.

इंटरचेंजवर सौरऊर्जा प्रकल्प

केवळ समृद्धी महामार्गच नाही, तर इतर प्रस्तावित महामार्गाच्या इंटरचेंजवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट हेदेखील महामंडळांच्या खात्यात जमा होईल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांचे  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या टीमने सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;