वोटचोरी होत आहे, तोपर्यंत भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढतच राहणार! राहुल गांधी यांचा मोदी सरकावर निशाणा

वोटचोरी होत आहे, तोपर्यंत भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढतच राहणार! राहुल गांधी यांचा मोदी सरकावर निशाणा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने निवडणुकीतील घोटाळ्यावर बोलत आहेत. त्यांनी पुराव्यांसह निवडणुकांमध्ये वोटचोरी कशी होते, ते दाखवून दिले आहे. तसेच भाजपला निवडणूक आयोग मदत करत असल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे. आता त्यांनी देशातील बेरोजगारीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. जोपर्यंत वोटचोरी होत आहे, तोपर्यंत भ्रष्टाचार आणि बोरजागारी वाढत राहणार असल्याचे सांगत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

याबाबत एक्सवर त्यांनी पोस्टही केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशातील तरुणांसमोर बेरोजगारीची सर्वात मोठी समस्या आहे. ही समस्या थेट वोटचोरीशी जोडलेली आहे. एखादे सरकार जनतेचा विश्वास जिंकून सत्तेत येते, तेव्हा त्याचे पहिले कर्तव्य म्हणजे तरुणांना रोजगार आणि संधी उपलब्ध करून देणे. मात्र, भाजप प्रामाणिकपणे निवडणुका जिंकत नाही. ते वोटचेरी करत निवडणूक संस्थांवर नियंत्रण ठेवून सत्तेत राहतात. त्यामुळेच बेरोजगारी 45 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. त्यामुळे नोकऱ्या कमी होत आहेत, भरती प्रक्रिया कोलमडल्या आहेत आणि तरुणांचे भविष्य धोक्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येक परीक्षेचा पेपर लीक होतो, प्रत्येक भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होत आहेत. देशातील तरुण कठोर परिश्रम करतात, स्वप्न पाहतात आणि त्यांच्या भविष्यासाठी लढतात. पण मोदी केवळ त्यांच्या जनसंपर्क, सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि अब्जाधीशांच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करतात. तरुणांच्या आशा-आकांशा भंग करणे आणि त्यांना निराश करणे, हीच या सरकारची ओळख बनली आहे. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. देशातील तरुणांना समजले आहे की खरी लढाई फक्त नोकऱ्यांसाठी नाही तर वोटचोरी विरोधात आहे. जोपर्यंत वोटचोकी होत आहे, तोपर्यंत देशात बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढतच राहील. देशातील तरुण आता वोटचोरी सहन करणार नाहीत. देशाला बेरोजगारी आणि वोटचोरीपासून मुक्त करणे, हीच खरी देशभक्ती आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;