मांजरा प्रकल्पाची 6 वक्र दारे 3 मिटरने उघडली; मांजरा नदीपात्रात 49871.84 क्युसेक्स विसर्ग सुरू

मांजरा प्रकल्पाची 6 वक्र दारे 3 मिटरने उघडली; मांजरा नदीपात्रात 49871.84 क्युसेक्स विसर्ग सुरू

मांजरा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ६ वक्र दरवाजे तब्बल ३ मिटरने उघडण्यात आलेली आहेत. ४९८७१.८४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदिकाठावरील गावांमधून पुराचे पाणी हाहाकार उडवणार असे दिसून येत आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने मंगळवारी 8.00 वाजता गेट क्रमांक 1,2,3,4, 5 व 6 (हे 6 गेट) 0.25 मीटरने उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र. 1,2,3,4,5 व 6) 3.00 मीटरने चालू असून मांजरा नदीपात्रात 49871.84 क्युसेक्स (1412.40क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;