Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – व्यवसायातून आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – उधार उसनवारीचे व्यवहार करू नका
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवण्याची शक्यता आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभासाठी प्रयत्न करावे लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरातील कामात गुंतून पडण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल उत्तम राहणार आहे
आर्थिक – शॉपिंगला जाण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या
आर्थिक – मानसन्मान मिळण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे दिवस आनंदात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक आर्थिक लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मिळून मिसळून वागा
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवण्याची शक्यता आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – कामाचा व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – गुंतवणुक करण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्यावी
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List