महिला डॉक्टरला फरफटत नेणारा सापडला, नांदेड एक्स्प्रेस दांपत्यावर हल्ला प्रकरण

महिला डॉक्टरला फरफटत नेणारा सापडला, नांदेड एक्स्प्रेस दांपत्यावर हल्ला प्रकरण

जून महिन्यात नांदेड स्पेशल एक्स्प्रेसमध्ये एका डॉक्टर दांपत्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला करून पसार झालेला चोरटा अखेर सापडला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्याला केरळ पोलिसांकडून ताब्यात घेतले.

पनवेल येथे राहणारे डॉ. योगेश देशमुख आणि डॉ. दीपाली देशमुख हे दांपत्य 4 जून  रोजी 9 वर्षांची मुलगी श्रद्धासोबत नांदेड येथे नातेवाईकाकडे निघाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून त्यांनी रात्री 1 वाजता सुटणारी एलटीटी-नांदेड स्पेशल ट्रेन पकडली होती. तिघे जण एस-4 या एसी बोगीत असताना एक अनोळखी इसम ट्रेनमध्ये शिरला. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास त्याने डॉ. दीपाली देशमुख यांच्या खाद्यावरील पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला दीपाली यांनी प्रतिकार केला. या खेचाखेचीत त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना डब्याच्या खाली खेचले आणि त्या ट्रेनखाली पडल्या. तो गोंधळ पाहून डॉ. योगेश यांनीदेखील ट्रेनमधून खाली उडी मारली. त्यात त्यांचा डावा हात तुटून खाली पडला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. अखेर त्याला केरळ पोलिसांनी एका गुह्यात पकडले असल्याचे समजताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. मोहम्मद सैफ ऊर्फ असगर अली चौधरी असे त्या आरोपीचे नाव आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;