भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, अपघातात चार विद्यार्थ्यांसह 5 जणांचा मृत्यू

भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, अपघातात चार विद्यार्थ्यांसह 5 जणांचा मृत्यू

भरधाव ट्रकने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात चार विद्यार्थ्यांसह चालकाचा मृत्यू झाला. अन्य तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बिहारमधील छपरा-मुजफ्फरपूर मार्गावर रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सर्वजण एमएम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी होते. एमएम पब्लिक स्कूल रविवारी सुरू असते आणि बुधवारी शाळेला सुट्टी असते. रविवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थी रिक्षाने घरी परतत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली.

अपघातात चालक आणि एक विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन विद्यार्थ्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. फरार ट्रक चालकाचाही पोलीस शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;