BEED NEWS – डोक्यात दगड घालून जन्मदात्या आईस मुलाने संपवले

BEED NEWS – डोक्यात दगड घालून जन्मदात्या आईस मुलाने संपवले

आपल्या जन्मदात्या आईलाच मुलाने डोक्यात दगड घालून संपवल्याची घटना परळी तालुक्यात घडली आहे. राहते घर नावावर करून देण्यासाठी मुलाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. सुनंदा ज्ञानोबा कांगणे असे मृत पावलेल्या आईचे नाव आहे. परळी तालुक्यातील भोजनकवाडीत ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

परळी तालुक्यातील भोजनकवाडीत पोटच्या मुलानेच राहत्या घरासाठी आईचा जीव घेतल्याची घटना रविवार दि. 20 रोजी रात्री ९.३० वाजता घडली. गेल्या काही दिवसापासून आरोपी चंद्रकांत ज्ञानोबा कांगणे हा त्याच्या आईच्या नावावर असलेले घर त्याच्या नावे करण्यासाठी मागे लागलेला होता मात्र आईने नकार दिल्याने मुलाने कुरूंदाचा दगड डोक्यात घालत आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. या प्रकरणी आरोपी चंद्रकांत कांगणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;