आधी तिकीट तपासले, मग Instagram वर रिक्वेस्ट पाठवली; तरुणीने सांगितला रेल्वेच्या TC चा प्रताप

आधी तिकीट तपासले, मग Instagram वर रिक्वेस्ट पाठवली; तरुणीने सांगितला रेल्वेच्या TC चा प्रताप

रेल्वेतून प्रवास करणे आता आणखी धोकादायक झाले आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्याकडूनच एका महिला प्रवाशाला धक्कादायक अनुभव आला आहे. रेल्वेतील टीसीने एका तरुणीला तिकीटाची विचारणा केली. या तरुणीने आपल्याकडचे तिकीटही दाखवले. पण या टीसीने या तरुणीला इन्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली. यामुळे तरुणी घाबरून गेली.

याबाबत सविस्तर वृत्त असे  की, Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका तरुणीने रेल्वेप्रवासाती आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये या तरुणीने म्हटले आहे की “मी नुकताच ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी एका टीसीने कोचमधील प्रवाशांची तिकीट तपासणी केली. यानंतर काही वेळाने मला एका अनोळखी व्यक्तीची Instagram रिक्वेस्ट आली. हा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून माझ्या कोचमधील तिकीट तपासणी करणारा टीसी होता. आणि त्यानेच मला इन्स्टाग्रामवर शोधले आणि फॉलो रिक्वेस्ट पाठवली, असे तिने सांगितले.

पुढे ती म्हणाली, मला वाटतं की त्याने माझे नाव आरक्षण यादीतून घेतले असावे.”पण या घटनेमुळे मी खूप अस्वस्थ झाली. हे प्रकऱण खूप विचित्र आहे. प्रवासादरम्यान दिलेली वैयक्तिक माहिती फक्त प्रवासापुरती मर्यादित असावी, असं मला वाटत. त्याचा अशा प्रकारे गैरवापर होऊ नये असं तिला वाटतं असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तरुणीने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी तिला कोणत्याही अनोळखी लोकांची रिक्वेस्ट न स्विकारण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी टीसी सोबत वाद घालू नये, असा अजब सल्ला दिला. अनेक युजर्सनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याविरोधात तक्रार नोंदवण्याचाही सल्ला दिला आहे.

TC checked my ticket and then my Instagram LOL 👀
byu/Active-Parking2365 inindianrailways

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;