पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मोदी जेव्हा जेव्हा अचानक बोलायला येतात तेव्हा तेव्हा मोठे निर्णय घेतात. मग नोटबंदी असो किंवा लॉकडाऊ. त्यामुळे आज मोदी काय बोलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्या मुद्द्यांवर मोदी बोलण्याची शक्यता?

– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसाच्या वार्षिक शुल्कामध्ये जबरदस्त वाढ केली आहे. या व्हिसाचा सर्वाधिक फायदा हिंदुस्थानी घेत आहेत. त्यामुळे अमेरिकेला जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या हिंदुस्थानींना धक्का बसला आहे. यावर मोदी बोलण्याची शक्यता आहे.

– मोदी सरकारने नुकतेच वस्तू व सेवा करात (जीएसटी) सुधारणांचे पाऊल उचलले. जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यात आले असून नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. याबाबतही मोदी बोलण्याची शक्यता आहे.

– टॅरिफमुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला झटका बसला असून अनेक छोट्या उद्योगांवर सक्रांत आली आहे. त्यामुळे स्वदेशीचा वस्तू वापराबाबतही मोदी बोलण्याची शक्यता आहे.

– सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे. देशभरामध्ये नवरात्रोत्सवाची धूम असणार आहे. यावरही मोदी बोलण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;