कोण आहे अदिती राव हैदरीची सवत? पूर्व पतीने प्रसिद्ध क्रिकेटरच्या मुलीशी केलं दुसरं लग्न

कोण आहे अदिती राव हैदरीची सवत? पूर्व पतीने प्रसिद्ध क्रिकेटरच्या मुलीशी केलं दुसरं लग्न

अभिनेत्री अदिती राव हैदरीने दुसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थशी तिने तेलंगणामधील एका मंदिरात गुपचूप लग्न उरकल्याचं कळतंय. अदिती आणि सिद्धार्थ यांचं हे दुसरं लग्न आहे. अदितीच्या पहिल्या लग्नाविषयी फार क्वचित लोकांना माहित आहे. कारण अदितीने तिच्या लग्नाची बातमी उघड केली नव्हती. मात्र घटस्फोटानंतर दोघांचं नातं सर्वांसमोर आलं होतं. अदितीच्या पूर्वी पतीने गेल्याच वर्षी दुसरं लग्न केलंय. अदितीचा पूर्व पती हा अभिनेता सत्यदीप मिश्रा आहे. सत्यदीप मिश्राने ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ताशी लग्न केलं. मसाबा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनरसुद्धा आहे.

सत्यदीपप्रमाणेच मसाबाचंही हे दुसरं लग्न आहे. मसाबाने आधी निर्माता मधू मंटेनाशी लग्न केलं होतं. सत्यदीप आणि मसाबा हे ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये एकत्र दिसले होते. मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी सत्यदीपने वकील म्हणून काम केलंय. त्याने बॉम्बे वेल्वेट, नो वन किल्ड जेसिका, फोबिया आणि विक्रम वेधा यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर मसाबा ही नीना आणि विवियन यांची मुलगी आहे. नीना आणि विवियन यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. मात्र या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba 🤎 (@masabagupta)

अदितीप्रमाणेच सिद्धार्थचं पहिलं लग्न अयशस्वी ठरलं. सिद्धार्थने 2003 मध्ये लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2007 मध्ये त्याने घटस्फोट घेतला. 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या वर्षी अदितीच्या 36 व्या वाढदिवशी, सिद्धार्थने तिच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अदिती आणि सिद्धार्थने तेलंगणामधील वनपार्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरमइथल्या रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. हे दोघं लवकरच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;